esakal | राहाता येथे टोकन पद्धतीने कोरोना लसीकरण

बोलून बातमी शोधा

लसीकरण
राहाता येथे टोकन पद्धतीने कोरोना लसीकरण
sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड चाचणी (covid test) व लसीकरण व्यवस्था एकाच इमारतीत असल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढला आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील प्रयोगशाळा अधिकारी संजय उबाळे (sanjay ubale) यांनी रामबाण उपाय शोधला. जेवढे लसीचे डोस तेवढेच टोकन वितरित केले. उर्वरित नागरिकांना घरी धाडले. गर्दी न होता अवघ्या चार तासांत लसीकरण आटोपले. अन्य केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठीही हीच पद्धत उपयुक्त ठरू शकेल. (Corona vaccination by token method at Rahata)

राहाता ग्रामीण रुग्णालयात एका बाजूला आरटीपीसीआर व अँटिजेन चाचण्यांची गर्दी, त्या शेजारी शवविच्छेदन गृहाजवळची गर्दी, बालकांना अन्य लसीकरणासाठी घेऊन येणाऱ्या महिलांची गर्दी, कोविड लसीकरणाची गर्दी आणि विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची गर्दी, असा अक्षरशः बाजार भरतो.

हेही वाचा: बंगालमध्ये विधान परिषद का नाही, दीदी कशा होणार मुख्यमंत्री?

कोविड चाचण्यांसाठी आलेले रुग्ण आवारात मुक्तपणे भटकतात. येथील कोविड चाचणी केंद्र जरी अन्यत्र हलविले, तरी संसर्गाचा धोका काही प्रमाणात कमी होईल. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही गर्दी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही टोकन पद्धती उपयुक्त ठरू शकेल.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. शुभांगी घोगरे, डॉ. विजय म्हस्के, डॉ. स्वाती म्हस्के, चेतन जोशी, कल्पना साबळे, रंजना व्यवहारे, मीनाक्षी कांबळे, सुनील बंगाळ, एस. एम. वाबळे आदी उपस्थित होते.

राहाता ग्रामीण रुग्णालयातील टोकन पद्धतीने लसीकरणाचा लाभ माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना झाला. रांगेत ताटकळणे व संसर्गाची जोखीम टळली. हा उपक्रम स्तुत्य आहे.

- प्रकाश देशपांडे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, साईसंस्थान

ग्रामीण रुग्णालय हे कोविड फैलावाचे मुख्य केंद्र झाले आहे, हे वास्तव आहे. येथील कोविड चाचणी केंद्र तातडीने अन्यत्र हलवावे लागेल. याबाबत आपण तहसीलदारांना कळविले आहे. गरज भासल्यास त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार आहोत.

- डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजप नेते

(Corona vaccination by token method at Rahata)