आली आली आली नगरमध्ये कोरोना लस आली

दौलत झावरे
Wednesday, 13 January 2021

जिल्ह्याला ३९ हजार २९० डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा परिषदेत शित साखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आले आहे. या लसींचा साठा येथूनच  जिल्हा शल्य चिकित्सक व महानगरपालिका स्तरावर वितरण होणार आहे. साठा उतरवून घेऊन साठवणूक होईपर्यंत जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. दादासाहेब साळुके आदी उपस्थित होते.

अहमदनगर : जिल्ह्यासाठी बुधवारी पहाटेच साडेतीन वाजता 39 हजार 290 कोविड 19 लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. राज्य कुटुंब कल्याण केंद्र, पुणे या कार्यालयामार्फत हे डोस नगर जिल्ह्याला मिळाले आहेत. 2 ते 8 डिग्री तापमानात ही लस ठेवण्यात आली आहे. राज्यस्तरावरुन केंद्रांची संख्या निश्चित झाल्यानंतर लाभार्थीच्या संख्येनुसार संबंधित केंद्रावर डोसेसचे वितरण केले जाणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

जिल्ह्याला ३९ हजार २९० डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचे डोस जिल्हा परिषदेत शित साखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आले आहे. या लसींचा साठा येथूनच  जिल्हा शल्य चिकित्सक व महानगरपालिका स्तरावर वितरण होणार आहे. साठा उतरवून घेऊन साठवणूक होईपर्यंत जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. दादासाहेब साळुके आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हा परिषदेतील डोस स्टोरेजसाठी स्वतंत्र व्यवस्थेच्या ठिकाणी विनित धुंदाळे, गिरीश धाडगे, किरण शेळके, सुनिल सुंबे, इमरान सय्यद या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona vaccine was received in Ahmednagar district on Wednesday morning