
Cotton fields submerged in water for over a week in Solapur, affecting farmers’ livelihood.
Sakal
शहरटाकळी : अतिवृष्टीमुळे शहरटाकळी परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन ही खरिपातील पिके पाच ते सात फूट पाण्यात बुडाल्याने उदध्वस्त झाली आहेत. त्यामुळे काढलेले कर्ज, घेतलेली मेहनत, बियाणे व खतं-औषधं यावर खर्च केलेला खर्च वाया गेला. आता मुलांचे शिक्षण, लेकीबाळींचे लग्न कसे करावे, अशी चिंता शेतकरी वर्गात आहे.