कोरोनाचा कहर! पारनेर तालुक्यात रुग्णांची अर्धशतकाकडे वाटचाल

मार्तंड बुचुडे
Saturday, 18 July 2020

तालुक्यात कोरोनाने हळूहळू पाय पसारण्यास सुरूवात केली आहे. शनिवार (ता. 18) अखेर रूग्णांची संख्या 35 झाली आहे. तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या आता अर्ध शतकाकडे वाटचाल करत असल्याने तालुक्यातील जनतेने आता तरी सावध होणे गरजचे आहे.

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात कोरोनाने हळूहळू पाय पसारण्यास सुरूवात केली आहे. शनिवार (ता. 18) अखेर रूग्णांची संख्या 35 झाली आहे. तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या आता अर्ध शतकाकडे वाटचाल करत असल्याने तालुक्यातील जनतेने आता तरी सावध होणे गरजचे आहे. सुरूवातीस मुंबई, पुणे येथून कोरोना आता लुक्यात आला. मात्र आता स्थानिकांनाच कोणत्याना कोणत्या कारणाने लागण होऊ लागली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस आता वाढू लागली आहे. अनेकांना संपर्कातून आता या रोगाची लागण होत आहे. अनेकांचे व्यावसाय तसेच प्रवास त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यातील 18 गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. या 18 गावात अत्तापर्यंतचे 35 रूग्ण झाले आहेत. शनिवारी सकाळी तालुक्यात नविन नऊ रूग्णांची नोंद झाली आहे. त्यात लोणी मावळा तीन, कर्जुले हर्या एक, पिंपळगाव रोठा दोन,  वडनेर बु. एक, कुभांरवाडी एक व खडकवाडी येथील एक अशा नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

तालुक्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या गावांमध्ये आज कोरोनाचेनव्याने रूग्ण आढळून आले आहेत. त्या गावात एक दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले असल्याचेही तहसीलदार देवरे यांनी सांगीतले. तर अनेक गावांमध्ये मागील दोन ते तीन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्या गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळलेल्या घराचा शंभर मिटर अंतराचा परीसर कॉन्टेंमेंन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. तेथे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून या परीसरत बाहेरील लोकांना जाण्यास व या परीसरात राहाणा-या अतील लोकांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आला आहे.
हेही वाचा : बापरे! शेवगावमध्ये १२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ‘एवढ्या’ दिवस केला लॉकडाऊन जाहीर
 

तालुक्यातील 18  गावांत कॉन्टेंमेन्ट झोन जाहीर
आठवडाभरात तालुक्यात 35 कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने त्या गावात रूग्ण सापडला. त्या परीसरात कॉन्टंमेंन्ट झोन जाहीर केला आहे. त्यात सिद्धेडरवाडी, वडुले, धोत्रे, माळकूप, पळसपूर, खडकवाडी, ढवळपुरी, लोणी मावळा, नांदूर पठार, कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा, वडनेर बु., अळकुटी, जवळा, सोबलेवाडी (नगरपंचायत क्षेत्र), कुंभारवाडी (नगरपंचायत क्षेत्र) यांचा समावेश आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The count of corona patients in Parner taluka 35