सोनई वगळता सर्व गावांची एकाच वेळी होणार मतमोजणी; तहसीलदार सुराणा यांची माहिती

Counting of votes has been planned in all 52 Gram Panchayats of Nevasa taluka
Counting of votes has been planned in all 52 Gram Panchayats of Nevasa taluka

सोनई (अहमदनगर) : नेवासे तालुक्यातील सर्व ५२ ग्रामपंचायत मतमोजणीचे नियोजन पुर्ण झाले असून सोनई गाव वगळता उर्वरित ५१ गावांची मतमोजणी एकाच टप्प्यात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली आहे. 

नेवासे फाटा येथील शासकीय गोदाम येथे सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. सर्व प्रथम टपालाची मतमोजणी करुन नंतर गावातील सर्व यंत्रातील मतमोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. फक्त सोनई  गावची मतमोजणी फेरीनुसार होणार आहे. १३ टेबलसाठी ७५ कर्मचारी काम पाहणार आहेत. फेरीनुसारच ग्रामस्थांनी हजर रहावे, असे सुराणा यांनी सांगितले. 

सकाळी आठ वाजता भालगाव, बहीरवाडी, बाभुळखेडा, म्हाळसपिंपळगाव, नारायणवाडी, ब-हाणपुर, मोरगव्हाण, गोणेगाव, चांदगाव, कारेगाव, गळनिंब, पुनतगाव. नऊ वाजता उस्थळखालसा, सुरेगाव, दिघी, पाचुंदा, निपाणी निमगाव, मक्तापुर, नजिक चिंचोली, टोका, बकूपिंपळगाव, खेडले, जळके बु., शिंगवेतुकाई. दहा वाजता बेल्हेकरवाडी, तरवडी, वरखेड, जळके खु.,भेंडे, मुरमे, सलाबतपुर, गोंडेगाव, खडका, निंभारी, लांडेवाडी, रामडोह. सकाळी ११ वाजता गेवराई, पिंप्रीशहाली, चांदा, रांजणगाव, बेलपिंपळगाव, देवगाव, कुकाणा, वाकडी, लोहगाव, घोगरगाव, तेलकुडगाव, प्रवरासंगम, उस्थळ,
सलाबतपुर, जेऊरहैबती आदी गावांचा एकाच फेरीत निकाल जाहीर केला जाईल. फक्त सोनईच्या प्रभागनुसार फेरी होईल, असेही सांगण्यात आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com