बातमी आहे स्वयंपाकघरातील... देशात आता मिठाची टंचाई?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी काम बंद आहे. तर काही ठिकाणी मजुरांना घराचे वेध लागले आहेत. गेल्या महिन्यापासून मिठागरातील काम करणाऱ्यांनी घरची वाट धरली.

नगर: लॉकडाउनमुळे अनेक उद्योगांना कुलूप लागले. तर काही उद्योग कायमचे जायबंदी झाले. काही उद्योगांना आता झळ बसली नसल्याचे दिसत असले तरी भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसणार आहेत. अगदी स्वयंपाक घरातदेखील त्याचे पडसाद उमटणार आहेत.

कॉनॉमिक्स टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. मीठाचे उत्पादन घेणाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, मिठाचे उत्पादन कमी झाले आहे. कारण कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे या ठिकाणी काम करणारे मजूर घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा - बुलाती है मगर जाने का नही..हनी ट्रॅप

कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी काम बंद आहे. तर काही ठिकाणी मजुरांना घराचे वेध लागले आहेत. गेल्या महिन्यापासून मिठागरातील काम करणाऱ्यांनी घरची वाट धरली. आता तर सरकारच या मजुरांना जाण्यासाठी खास रेल्वे व्यवस्था करीत आहे. या पार्श्वभूमीवर मिठागरातील काम ठप्प झाले आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट आलीच आहे. परंत जे तयार मीठ आहे, ते वाहनात भरण्यासाठीही मनुष्यबळाचा अभाव आहे.

 

ऑक्टोबर ते जून या कालावधीत मीठ तयार केले जाते. सर्वात जास्त उत्पादन मार्च आणि एप्रिल महिन्यात होते. नेमके याच महिन्यात काम झालेले नाही. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम जाणवत आहे.

गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे ९५ टक्के मिठाचे उत्पादन होते. महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मिठागरे आहेत. दरवर्षी भारतामध्ये 200 ते 250 लाख किलो मीठाचे उत्पादन केले जाते.

इकॉनॉमिक्स टाइम्सला इंडियन सॉल्ट मॅन्यूफॅक्सर्स असोसिएशन (ISMA)चे प्रेसिडेंट भरत रावल म्हणतात, मार्च आणि एप्रिल महिन्यात कामच झाले नाही. त्यामुळे मजुरांचे तसेच उत्पादक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. कारण हेच महिने कामाचे असतात. 

या काळात एक महिना जरी काम बंद  राहिले तरी इतर इंडस्ट्रीच्या चारपट नुकसान होते.आता आमच्याकडे केवळ 45 दिवस अाहेत. मीठ उत्पादनाची सायकल 60 ते 80 दिवसांची असते.

कशामुळे झाला परिणाम

'उत्पादन वाढले नाही तर प्रसंग कठीण होईल. कारण आमचा ऑफ सीजन (पावसाळा) बफर स्टॉक एवढा जास्त नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊन संपल्यानंतर इंडस्ट्रीजमध्येही मीठाची मागणी वाढेल. पाऊस उशिरा आला तरच मिठाचे उत्पादन वाढेल.अन्यथा देशात मिठाची टंचाई जाणवू शकते, असेही रावल म्हणतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country will now experience a shortage of salt