esakal | कोपरगावात कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू

बोलून बातमी शोधा

Covid care center has reopened in kopargaon}

तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कोविड केअर आणि हेल्थ केअर केंद्राना भेट देऊन पाहणी केली.

कोपरगावात कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने महाविकास आघाडी सरकारने तालुकास्तरावर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तालुक्‍यात गुरुवारपासून (ता.चार) कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होत असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
 
तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रत्यक्ष कोविड केअर आणि हेल्थ केअर केंद्राना भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक दौलत जाधव व वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, ग्रामीणचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. विजय गनबोटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डॉ. गायत्री कांडेकर आदी उपस्थित होते.

लायन्स मूकबधिर विद्यालयातील शुक्रतीर्थ कोविड केअर सेंटरमध्ये 50 रुग्णांना उपचार व सेवा देता येईल, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.