esakal | पारनेर तालुक्यातील ३४ गावांत कोविड सेंटर

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर
पारनेर तालुक्यातील ३४ गावांत कोविड सेंटर
sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः ग्रामस्थ व (Parner) पंचायत समितीच्या सहकार्यातून तालुक्‍यातील वाडेगव्हाण, कडूस, सावरगाव, राजणगाव मशीदसह 34 गावांमध्ये नव्याने कोविड सेंटरचे (carona virus) उद्‌घाटन करण्यात आले. सभापती गणेश शेळके यांच्या हस्ते यातील काही कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. (Kovid Center started in 34 villages in Parner taluka)

अनेकांनी कोविड सेंटर सुरू करून जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक गावे माझा गाव माझी जबाबदारी या उक्तीप्रमाणे गावाची जबाबदारी घेतल्याने आता अनेक गावे कोरोनासाठी स्वयंभू व आत्मनिर्भर होत आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही असा आदर्श प्रयोग प्रथमच ग्रामस्थांनी सुरू केला.

हेही वाचा: व्हॉलीबॉल खेळणाऱ्या तरूणावर गोळीबार

तालुक्‍यातील अनेक गावात ग्रामपंचायत तसेच गावातील सेवाभावी कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्था व दानशूरांच्या माध्यामातून व पंचायत समितीच्या सहाकार्यातून अनेक गावात कोविड सेंटर सुरू झाले आहेत. त्या ठिकाणी राहाण्याची व औषधोपचाराची सोय करण्यात येत आहे. आतापर्यंत वाडेगव्हण, कडूस, सावरगाव या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले. तर लवकरच रांजणगाव मशीद, कुरूंद, गोरेगाव, खडकवाडी, राळेगण थेरपाळ, दरोडी व ढवळपुरी येथेही अशी कोविड सेंटर केवळ जनतेच्या सोयीसाठी केली जाणार आहेत.

ग्रामपंचायतीस परवानगी

पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीस (grampanchayat) ठराविक खर्च करण्यास परवानगी दिली आहे. त्याच बरोबर औषधांचाही काही प्रमाणात आम्ही पुरवठा करणार आहोत. या कोविड सेंटरसाठी गावातील किंवा परिसरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा घेतली जावी अशी अपेक्षा आहे.

- गणेश शेळके, सभापती पारनेर

(covid Center started in 34 villages in Parner taluka)