esakal | पतसंस्थांचे अनेक प्रश्‍न लागेल एकाच बैठकीत मार्गी 
sakal

बोलून बातमी शोधा

Credit unions will have many questions to solve in a single meeting

राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काही विषयांबाबत आदेश काढल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

पतसंस्थांचे अनेक प्रश्‍न लागेल एकाच बैठकीत मार्गी 

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काही विषयांबाबत आदेश काढल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली. 

एकाच बैठकीत सहकारी पतसंस्थांचे बरेच प्रश्न मार्गी लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, काही प्रश्न प्रलंबित असले, तरी या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन स्वागत करीत आहे. 

पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की कलम 101चे दाखले ऑनलाइन मिळण्यासाठी वसुली दाखला जास्तीत जास्त 60 दिवसांत मिळण्यासाठी, या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे सहकार आयुक्तांनी कार्यवाही करावी.

थकबाकीदारांची मालमत्ता लिलाव करण्यापूर्वी अपसेट प्राइस दोन महिन्यांत न मिळाल्यास ऋणको संस्थेने दाखल केलेली अपसेट प्राइस मान्य झाल्याचे समजण्यात येईल, तसेच धनको संस्थेचे व ऋणको संस्थेचे एकमत न झाल्यास ऋणकोस ती मालमत्ता विकण्यासाठी 30 दिवसांची मुदत देऊन, त्यानंतर धनको संस्थेस ही मालमत्ता विकण्यास परवानगी मिळण्याबाबत सूचित करण्यात आले. 

संपादन : अशोक मुरुमकर