.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Kotwali police station under investigation after woman alleges extortion and misconduct by PI.
अहिल्यानगर: कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हे वादात अडकले आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवालीचे निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दराडे यांनी संबंधित महिलेविरुद्ध देखील जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.