Ahmednagar News : पीक विविधीकरणाचा प्रकल्प शेतकऱ्यांना दिशादर्शक - डॉ. सुनील गोरंटीवार

मानोरीत कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून ड्रोन प्रात्‍यक्षिक
crop sowing system project beneficial for farmers
crop sowing system project beneficial for farmersSakal

Ahmednagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये बदलत्या हवामानावर लक्ष केंद्रित करुन विविध पीकपद्धतींवर संशोधन सुरू आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांमध्ये राबविल्या जाणाऱ्या पीक विविधीकरणाच्या पथदर्शी प्रकल्पामध्ये विविध पिकांची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

हा प्रकल्प शेतकऱ्यांना दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले. या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुक्यातील मानोरी येथील खिळे वस्तीवरील दीपस्तंभ ॲग्रोफार्मर्स प्रोड्यूसर कंपनीत करण्यात आले होते.

त्यात ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, डॉ. विक्रम कड, डॉ. सचिन नलावडे, भाजीपाला प्रकल्पाचे डॉ. भारत पाटील, एकात्मिक शेती पद्धतीचे डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. विक्रम कड यांनी हरभरा काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन, डॉ. भारत पाटील यांनी कांदा पीक व्यवस्थापन, डॉ. चांगदेव वायाळ यांनी हरभरा कीड व्यवस्थापन व डॉ. दत्तात्रय वने यांनी हरभरा शेतीतील अनुभव,

या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. डॉ. सचिन नलावडे यांनी उपस्थितांना ड्रोनसंबंधीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले. आभार डॉ. आदिनाथ ताकटे यांनी मानले.

crop sowing system project beneficial for farmers
Ahmednagar: पतंगोत्सवाचा मोबाईलकडून ‘गेम’! विक्री थंडावली; पुणे-नाशिकच्या व्यापाऱ्यांकडून अहमदनगरच्या पतंगांना मागणी

कार्यक्रमासाठी दीपस्तंभ ॲग्रो फार्मस प्रोड्यूसर कपनीचे संग्राम धुमाळ, अप्पासाहेब हापसे, भाऊसाहेब खिलारी तसेच सदस्य शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अडीचशे एकरावर हरभरा लागवड

राहुरी तालुक्यातील मानोरीत दीपस्तंभ ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने यांच्या सहकार्याने हरभरा पिकाच्या फुले विक्रम या वाणाची १९५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. वांबोरी येथे ५५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेतली आहेत. याची पाहणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com