श्रीगोंद्यापाठोपाठ जामखेड तालुक्‍यातील कावळ्याला "बर्ड फ्ल्यू', निंबळकमध्ये ६६ कोंबड्या दगावल्या 

वसंत सानप
Saturday, 16 January 2021

जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड-बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ चार दिवसांपूर्वी एक कावळा व कोकीळा अशा दोन पक्षांचा मृत्यू झाला होता.

जामखेड : तालुक्‍यात कोरोनाचे संकट उभे ठाकले आसतानाच आता जामखेड तालुक्‍यात बर्ड फ्लूय ने "इन्ट्री' केली आहे. तालुक्‍यातील रेडेवाडी येथील कावळ्याचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. 

जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड-बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ चार दिवसांपूर्वी एक कावळा व कोकीळा अशा दोन पक्षांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - दोन कावळ्यांच्या भांडणात एक झाला गतप्राण, पुढे समोर आला धक्कादायक प्रकार

या बाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वनविभागाचे अधिकारी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. यानंतर त्या पक्षांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील विभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

आज त्याचा अहवाल मिळाला असून, तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जामखेड तालुक्‍यात ज्या ठिकाणी पक्षी असतील, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणे सुरू आहे, असे पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. गवारे यांनी सांगितले. 
 

निंबळकमध्ये दोन दिवसांत 66 कोंबड्या मृत 
निंबळक (ता. नगर) येथील 66 कोंबड्या मृत्यूमुखी पडलेल्या असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

भानगाव (ता. श्रीगोंदे) येथील मृत कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झालेले आहे. सुदैवाने अद्याप कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. आठवडमध्येही मृत कोंबड्या आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे.

निंबळक येथेही 66 कोंबड्या मृत आढळून आल्याने नगर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. आठवड व निंबळक येथील नमुन्यांचे अहवाल काय येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crow in Jamkhed taluka gets 'bird flu'