
कर्जत तालुक्यात श्रीगोंदे, जामखेड, आष्टी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यातील शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्रे बंद असतात.
कर्जत : तालुक्यातील मिरजगाव येथे शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र, तेथे वाहने व शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने, तालुक्यात दुसरे शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून हे केंद्र सुरू झाले. मिरजगाव येथे छत्रपती जिनिंगच्या माध्यमातून शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले.
हेही वाचा - नगरमध्ये अवकाळी पावसाचा पुन्हा फटका
कर्जत तालुक्यात श्रीगोंदे, जामखेड, आष्टी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यातील शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्रे बंद असतात. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांना दोन दिवस अधिक काढावे लागत आहेत.