चाहत्यांच्या गर्दीने 'गोल्डन मॅन' चा शनिशिंगणापुरातून काढता पाय

दर्शनानंतर गोल्डमॅनला मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी सुरक्षा विभाग व पोलिसांची चांगलीच दमछाक झाली
Crowd of fans took Golden Man out of Shanishinganapura
Crowd of fans took Golden Man out of Shanishinganapura

सोनई (अहमदनगर) - पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील गोल्डमॅन सनी वाकचौरे, बंटी गुजर व विपुल वाखुरे आज शनिदर्शनाला आले खरे मात्र त्यांचेच दर्शन व्हावे म्हणून उत्साही युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सर्वांना घाईगडबडीत दर्शन अटोपून काढता पाय घ्यावा लागला.

दर्शनानंतर गोल्डमॅनला मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी सुरक्षा विभाग व पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. वाकचौरे व गुजर यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करुन दर्शन घेतले. श्रावणी शनिवार निमित्त आज भाविकांची गर्दी असल्याने काही किलो सोन्याचे दागिने गळ्यात, हातात आणि पायात घालून आलेल्या गोल्डमॅनला पाहण्यासाठी व त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी हाजारो युवकांनी गर्दी केली होती.

महाद्वार समोरील रस्त्यापर्यंत त्यांची गोल्ड रंगाची आॅडी कार मोठी कसरत करीतच आणण्यात आली. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने खाजगी व देवस्थानच्या सुरक्षा विभागाने कसातरी मार्ग काढीत त्यांना पानसनाला पुलाच्या पुढे मार्ग काढून दिला. शिवाजंली चौकापर्यंत चाहते वाहनाच्या पाठीमागे पळत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com