esakal | कर्जत तालुक्यात आता सांस्कृतिक चळवळ जोर धरणार, पवारांनी घातले लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

The cultural movement will now gain momentum in Karjat taluka, Pawar said

येथील दादा पाटील महाविद्यालयात शारदाबाई पवार सभागृह भूमिपूजन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके होते.

कर्जत तालुक्यात आता सांस्कृतिक चळवळ जोर धरणार, पवारांनी घातले लक्ष

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत तालुक्यात आता सांस्कृतिक चळवळही जोर धरणार आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी सुरू केली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे शिक्षण विषयक विचार मांडले ते विचार घेऊनच शरद पवार शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कार्यास अधिक ताकद देण्यासाठी, शिवाय कर्जत-जामखेड तालुक्यात पाणी, रस्ते, आरोग्य, क्रीडा, प्रशासन या सर्वच क्षेत्रात विकास कामांना गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. या हेतूनेच दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य असे सभागृह उभारणार आहोत, असे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांनी केले.

येथील दादा पाटील महाविद्यालयात शारदाबाई पवार सभागृह भूमिपूजन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके होते.

संस्था जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, बाळासाहेब साळुंखे, काकासाहेब तापकीर, नितीन धांडे, तात्यासाहेब ढेरे, रज्जाक झारेकरी, दीपक शिंदे, अशोक जायभाय,एड सुरेश शिंदे, बापूसाहेब नेटके, दादासाहेब चव्हाण, सुनील शेलार, मंदार सिकची, मोहन गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

फाळके म्हणाले , कर्जत तालुक्याची ओळख शिक्षणाच्या माध्यमातून सर्वदूर आहे. शिक्षणाबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांची जडणघडण व्हावी या हेतूने पवार साहेबांच्या संकल्पनेतून हे भव्य सभागृह उभारले जाणार असून ते महाविद्यालयाच्या वैभवामध्ये मानाचा तुरा ठरणारे आहे.

या वेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.कांबळे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेऊन गुणवत्ता वाढीसाठी कराव्या लागणाऱ्या सेवासुविधा विषयक गरजांचा मागोवा घेतला. त्या सुविधांसाठी पाठपुरावा निश्चित केला जाईल असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रमोद परदेशी यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.संतोष लगड यांनी मानले.

ग्रामीण भागातील दादा पाटील महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळ कांबळे आणि सर्व सहकाऱ्यांचे आ रोहित पवार यांनी विशेष कौतुक केले. 

loading image