
अहिल्यानगर : बोगस बँक खात्यावरून परकीय चलन (यूएसडीटी) एक्सचेंज केलेले पैसे एंजल एक्स ॲप व एंजल एक्स सुपर ॲपच्या माध्यमातून काढून घेत नगरमधील चौंघाची ९७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील ॲक्सिस बँक, सारस्वत बँक व एसबीआय बँक (केडगाव शाखा) खात्यातून २९ ऑगस्ट २०२४ ते १६ जुलै २०१५ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. याबाबत कन्सल्टंट इंजिनिअर गौरव सुधीर महाजन (वय ३८, रा. औरा टॉवर, नंदनवननगर, तपोवन रोड, सावेडी) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.