
पारनेर : इंडियन ऑईलच्या खोट्या कागदपत्रांद्वारे विश्वास संपादन करत ऑनलाईन पध्दतीने पेट्रोलपंप डिलरशिप मिळवून देतो असे आमिष दाखवत, इंडियन ऑइल कॉपोरेशनच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून अमोल राजाराम तुपे( रा. लोणीमावळा ) या तरुणांची तब्बल 23 लाख 43 हजार 900 रुपयांची फसवणूकझाली आहे. या बाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.