
Srirampur Fraud:
श्रीरामपूर : शहरातील मोरगेवस्ती येथील रहिवासी व खासगी वित्तीय कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या विनय रमाकांत इनामके (वय ५२) यांची तब्बल पाच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पगारातून काटकसरीने बचत करून ठेवलेली रक्कम क्षणात गायब झाल्याने इनामके हतबल झाले आहेत.