
सोनई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात शनिशिंगणापूर येथील अॅप घोटाळ्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारी (ता.१२) रात्री शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अहिल्यानगर येथील सायबर शाखेच्या वतीने ऑनलाईन पूजा करणाऱ्या पाच कंपनीच्या विरोधी फिर्याद देण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टला अनेकदा फिर्याद देण्याची सूचना देऊनही त्यांनी टाळाटाळ केल्याचा उल्लेख फिर्यादमध्ये आहे. ‘सायबर’चे फौजदार सुदाम काकडे यांनी फिर्याद दाखल केली.