
पाथर्डी : शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेअंतर्गत बोगस जनावरे दाखवून बनावट व भेसळयुक्त दूध विक्री करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अर्जुन पोपट धायतडक यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिलेल्या तक्रारीवरून दुग्धविकास विभागाच्या आदेशाने चौकशी सुरू झाली आहे.