

Dalit organizations march in Sonai demanding MCOCA action against the accused in the Dalit youth attack case.
Sakal
सोनई : दलित युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संशयित आरोपी मोकाट फिरत असल्याने वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष व विविध दलित संघटनेच्या वतीने सोनई पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. घटनेला आठ दिवस उलटूनही तपासात प्रगती नसल्याने निषेध सभेत अनेक वक्त्यांनी गावात फोफावत असलेली दादागिरीवर आवाज उठविताना पोलिस यंत्रणेवर टीकेचा भडिमार केला.