

अहिल्यानगर: दुचाकीने घरी चाललेल्या तलाठ्याचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी नालेगाव अमरधामसमोरील परिसरात घडला. राहुल अरुण व्हटकर (रा. सावेडी) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा नायलॉन मांजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.