esakal | शनिजयंतीलाही मंदिर बंद, मू्र्तीला केकचा नैवेद्य!
sakal

बोलून बातमी शोधा

शनिमूर्ती शिंगणापूर

शनिजयंतीलाही मंदिर बंद, मू्र्तीला केकचा नैवेद्य!

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर): शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळ बंदचा आदेश असल्याने आज शनिशिंगणापुर येथे शनिजयंती सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाद्वारात सरंक्षण कठडे टाकून मंदीरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. तुरळक प्रमाणात आलेल्या भाविकांनी कळस दर्शनावर समाधान मानले.

शनैश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून गंगाजलने गंगापूजन, शांतीपाठ,अभिषेक करण्यात आला.पावणे बारा वाजता स्वयंभू शनिमुर्तीला पंचामृत स्नान,तेल अभिषेक, महानैवेद्य दाखवून महापुजा झाली. महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. भाविकांच्या गैरहजेरीत प्रथमच असा सोहळा झाल्याने शनिदेवाचा जयघोष झाला नाही. (Darshan also closed in Shinganapur on Shani Jayanti day)

हेही वाचा: मराठा क्रांती मोर्चात जमलेल्या कोट्यवधी रूपयांचे काय झालं?

शनि चौथा-याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जयंतीनिमित्त मूर्तीसमोर मोठा केक ठेवण्यात आला होता. मूर्तीला सुवर्ण मुकुट, नवरत्नाचा हार व सर्व सोन्याचांदीचे अलंकार घालण्यात आले होते. सुरत येथील शनिभक्त पंकज पटेल यांनी पाठविलेल्या पंधरा तोळे सोन्याची सुर्यपदक चैन देवाला अर्पण करण्यात आली.

विश्वस्त मंडळाने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनिजयंती निमित्तची कावड यात्रा, मिरवणूक, कीर्तन सोहळा, मोफत आरोग्य शिबीर व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम रद्द करुन कुणालाच मंदीरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जाहीर केले होते. मोजके विश्वस्त,कर्मचारी,पुरोहित,स्वच्छता कर्मचारी असे वीस ते पंचवीस व्यक्ती सोहळ्यास उपस्थित होते.

मंदीर बंदचा आदेश असल्याने आजचा शनिजयंती सोहळा अतिशय साध्या पद्धतीने व मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला.यापुढेही देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोना संसर्गाची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.

- भागवत बानकर,अध्यक्ष शनैश्वर देवस्थान (Darshan also closed in Shinganapur on Shani Jayanti day)