esakal | काँग्रेसच्या दबावाखाली येऊन ठाकरे सरकारने ‘तो’ निर्णय रद्द केला?
sakal

बोलून बातमी शोधा

Dashrath Sawant letter to Chief Minister Uddhav Thackeray regarding emergency pension

अणीबाणीत आम्ही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने तुरुंगात गेलो. त्याबदल्यात ४० वर्षात कोणत्याही सरकारकडे आम्ही काहीच मागितले नाही.

काँग्रेसच्या दबावाखाली येऊन ठाकरे सरकारने ‘तो’ निर्णय रद्द केला?

sakal_logo
By
शांताराम काळे

अहमदनगर : अणीबाणीत आम्ही स्वातंत्र्याच्या प्रेरणेने तुरुंगात गेलो. त्याबदल्यात ४० वर्षात कोणत्याही सरकारकडे आम्ही काहीच मागितले नाही. भाजप सरकारने पेन्शन दिली व महाविकास आघाडी सरकारने राजकारणापायी ते काढून घेतले. आम्ही सरकारच्या दारात मागायला गेलेलो नसताना आमचा हा अपमान तुम्ही का केला? आमच्या आत्मसन्मानाचा अवमान करू नका, असे भावनिक पत्र ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

नुकतेच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचे पेन्शन ठाकरे सरकारने बंद केली आहे. 82 वर्षाचे दशरथ सावंत पत्रात म्हणतात, आणीबाणीत स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. ते न बघवल्याने आमच्यासारखे अनेक लोक कुटुंबाच्या हिताची पर्वा न करता आंदोलन करून तुरुंगात गेले. त्यानंतर काँग्रेस सरकार पराभूत झाले. पण तुरुंगवासाच्या बदल्यात जनता सरकारने आम्हाला काही द्यावे असे आम्ही कधीच मागितले नाही. ४० वर्षात आम्ही कोणत्या सरकारकडे कोणतीच याचना केली नाही. परंतु मागील भाजप सरकारने आम्हाला पेन्शन दिली. त्यासाठीही नोकरशाहीने भरपूर त्रास दिला. आज तुम्ही ते पेन्शन बंद करून आमच्यासारख्या आयुष्याचे काही शेवटचे दिवस उरलेल्या व्यक्तींना अवमानित केले आहे.

हेही वाचा : ठाकरे सरकारचा भाजपला आणखी एक दणका.... आता केले ‘हे’
आर्थिक बचत करण्यासाठी हा निर्णय घेतला, असे सरकारने म्हटले होते. त्याबाबत सावंत यांनी तिरकसपणे मंत्र्यांसाठी खरेदी केलेल्या गाड्यांची आठवण करून दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर महिन्याला साडेबारा हजार कोटी दर महिन्याला खर्च होताना बचतीसाठी त्यांना तुम्ही हात लावत नाही. परंतु या 24 कोटीसाठी मात्र तुम्हाला बचत आठवली याचीही जाणीव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.
पत्राच्या शेवटी काँग्रेससोबत सरकार आहे व काँग्रेसने आणीबाणी लागली होती. त्यामुळे आणीबाणी विरोधकांच्या या पेन्शन ला काँग्रेसचा विरोध आहे. म्हणून ही पेन्शन बंद केली आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला असून काँग्रेसचा या आणीबाणीला विरोध असल्यामुळे त्यांच्या दडपणाखाली तुम्ही हा निर्णय घेतला का? असा प्रश्न विचारला आहे.
पत्राच्या शेवटी महाराष्ट्राची अस्मिता बाळासाहेब ठाकरे यांनी जपली. खेड्यापाड्यातील तरुणांच्या मनात स्वाभिमान जागृत केला. काँग्रेसच्या राजकारणाविरुद्ध लढा दिला तेव्हा काँग्रेसच्या दडपणाखाली न येता महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही जागृत ठेवावा काँग्रेसच्या दडपणाखाली येऊ नये असेही आवाहन त्यांनी केले आहे. अहमदनगर नगर

संपादन : अशोक मुरुमकर  

loading image