

Hard Work Pays Off: Jyoti Panmand Cracks Supply Inspector Exam with State First Rank
Sakal
निघोज : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर स्वप्नांना गवसणी घालता येते, हे ज्योती संभाजी पानमंद यांनी सिद्ध करून दाखवले. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या निकालात राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ज्योती पानमंद यांची अन्न व प्रशासन विभागात राजपत्रित पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.