अनैतिक संबंधामुळे ७ जणांची हत्या? भीमा नदी पात्रातील मृतदेहांबाबत नवा ट्विस्ट: Ahmednagar Murder Mystry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Murder Mystry

Ahmednagar Murder Mystery: अनैतिक संबंधामुळे ७ जणांची हत्या? भीमा नदी पात्रातील मृतदेहांबाबत नवा ट्विस्ट

भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्या नसून त्यांची हत्या केली असल्याची माहिती काही तासांपूर्वी समोर आली. मृत्यूमागे करणीचे कारणदेखील देण्यात आले. दरम्यान, अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. (Daund murder dead bodies of 7 members of one family Murder due to an immoral relation)

पारगाव ( ता.दौंड ) येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ वाढत चालले आहे. आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाचा राग मनात धरून हे कृत्य केले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.

Ahmednagar Murder Mystry: आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?

भीमा नदी पात्रात बुधवार ( ता. १८ ) पासून एकाच कुटुंबातील सात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार ( वय ४० दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे ( वय २८ ), राणी शाम फुलवरे ( वय २४ ) रितेश उर्फ भैय्या ( वय ७ ), छोटू शाम फुलवरे ( वय ५ ) कृष्णा शाम फुलवरे ( वय ३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा: Crime News : पुणे जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील सात जणांची भीमा नदीत आत्महत्या

हे सर्वजण हल्ली निघोज ( ता. पारनेर ) येथे मजुरीसाठी आले होते. पवार पती पत्नी हे फुलवरे यांचे सासू सासरे आहेत. या घटेनेच्या तपासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. या पथकाला संशयितांपर्यंत पोहचण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. मृत हे बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :Pune Newsnagar