गर्भपाताच्या गोळ्या खाणं पडलं महागात; तरुणीचा मृत्यू | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

girl death

गर्भपाताच्या गोळ्या खाणं पडलं महागात; तरुणीचा मृत्यू | Ahmednagar

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाल्लेल्या तरुणीचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गर्भपाताच्या गोळ्या खाणं पडलं महागात; तरुणीचा मृत्यू

आरोपी सईद बेग याने मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. लग्नाची विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या आणून तिला खाऊ घातल्या. त्यामुळे मुलीस पोटदुखी, उलटीचा त्रास सुरू झाला. अतिरिक्‍त स्त्रावाने तिची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल आरोपी सईद बेग याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह! पवार कुटुंबीय करणार कन्यादान

या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सईद ताहेर बेग (वय ३३, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. आरोपीला सईदला अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

हेही वाचा: खासदार नको; तुम्ही आर. आर. आबा व्हा

loading image
go to top