अखेर ‘त्याची’ मृत्यूशी झुंज संपली; कोट्यावधी रुपये खर्च करुनही २६ वर्षाच्या तरुणावर नियतीचा घाला 

मनोज जोशी
Sunday, 3 January 2021

शिक्षण बीएससी ॲग्री, घरची शेतीही उत्तम घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याबरोबर समाजाला द्यावा हा विचार त्याने मनात रुजवला होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

कोपरगाव (अहमनगर) : शिक्षण बीएससी ॲग्री, घरची शेतीही उत्तम घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याबरोबर समाजाला द्यावा हा विचार त्याने मनात रुजवला होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 

तालुक्‍यातील रवंदे येथील प्रशांत बाळासाहेब भुसे (वय 26) या अविवाहित तरुणावर आई-वडिलांनी उपचारासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले, चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयात देशपातळीवरील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. बाला यांनी हृदय आणि फुप्पुस प्रत्यारोपण केले. पण 19 महिन्यापासून सुरू असलेली प्रशांतची मृत्यूशी झुंज अखेर संपली, त्याचे नुकतेच निधन झाले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रशांत भुसे ऑक्‍टोबर 2018 मध्ये आजारी पडला होता, त्याच्यावर नाशिक, पुणे, मुंबईत हिंदुजा, रुबी हॉस्पिटल आणि त्यानंतर चेन्नईच्या प्रख्यात फोर्टिस रुग्णालयात उपचार केले. तेथे तीन महिन्यापासून उपचार घेत होता, त्याच्यावर डॉ. बाला यांनी एकाच वेळी हृदय आणि फूफुस बदलाची शस्त्रक्रिया केली. 

आई- वडिलांच्या डोळ्यात त्याच्या जीवनाचे आशेचे किरण दिसत होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. प्रशांत येवला येथील दराडे महाविद्यालयातून बीएससी ॲग्री उत्तीर्ण झाला होता. आई-वडिलांनी त्याच्या आजारपणावर कोट्यावधी रुपये खर्च केले पण हाती काहीच लागले नाही. रवंदेवासिय प्रशांतच्या अकाली निधनाने शोकसागरात बुडाले. अखेर त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a youth from Ravande in Kopargaon taluka