esakal | चल, मेरी लुना... शर्यतीत डेक्कन क्विनलाही हरवलं होतं या मोपेडने
sakal

बोलून बातमी शोधा

Deccan Queen Luna defeated the moped

लुना ही आताच्या पिढीला माहिती नसेल परंतु या वाहनाने तरूणाईला त्या काळी वेड लावले होते. त्या सायकलच्या युगात सर्वसामान्यांचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम लुनाने केले. पेट्रोल संपले तरी ही लुना पायडल मारून सायकलसारखी चालविता यायची.

चल, मेरी लुना... शर्यतीत डेक्कन क्विनलाही हरवलं होतं या मोपेडने

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः अहमदनगर हे निजामशाहीची राजधानी असलेलं शहर. या शहराचा तेव्हा आखाती देशासोबत व्यापार चालायचा. नंतरच्या काळात या राजधानीचे अस्तित्व हरवायला लागलं आणि थेट त्याचं रूपांतर खेडे गावात झालं. महापालिका असलेल्या या शहराचा तोंडवळा आजही शहरी नाही. मात्र, या खेडेगावात जन्मलेल्या तसेच या शहराला कर्मभूमी मानणाऱ्या अनेक उद्योजकांनी जगाचं आपल्याकडं लक्ष वेधून घेतलं. त्यात फिरोदिया, धूत, सारडा अशा काही घराण्यांची नावं घेता येतील.

फिरोदिया कुटुंबाने नगरसारख्या गावात कायनेटिक नावाची कंपनी सुरू केली. धूत परिवाराने व्हिडिओकॉन नावाचे प्रॉडक्ट आणले. ते सर्वपरिचित आहेच. परंतु सर्वाधिक हवा केली ती फिरोदिया यांच्या लुनाने. चल मेरी लुना...अशी टीव्हीला जाहिरात पाहिली की फिरोदियांपेक्षा सगळ्याच नगरकरांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा उर अभिमानाने भरून यायचा.

हेही वाचा - नगर-सोलापूरसाठी घेतली रोहित पवारांनी बैठक

नगरचे आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम फिरोदिया परिवाराने त्या काळात कायनेटिक आणि आता फोर्सच्या माध्यमातून करीत आहेत. हस्तीमल फिरोदिया हे एस.टी.च्या दापोडीतील वर्कशॉपमध्ये मोठे इंजिनिअर होते. नंतर त्यांनी बंधू नवलभाऊ, मोतिभाऊ यांच्या सहकार्याने कायनेटिक कंपनी स्थापन केली आणि तीही नगरमध्ये.

नगर हे औद्योगिकीकरणात तसं मागासलेलं शहर असतानाही हस्तीमलजींनी येथे कंपनी स्थापन्याची रिस्क घेतली. एमआयडीसीकडून कोणतीही सुविधा न त्यांनी कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी स्थापन केली. एकटी कायनेटिक नगरला ४० टक्के जकात द्यायची. कायनेटिकमुळे हजारो उद्योजक तयार झाले. हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला. हस्तीमलजींचे थोरले बंधू नवलभाऊ हे उद्योग क्षेत्रात अग्रेसर होते. दुसरे बंधू मोतिभाऊ हे खासदार होते. त्यांचा जिल्हा बँकेच्या स्थापनेत मोठा वाटा आहे, असे रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर सांगतात. 

क्लिक करा - सिरिअस पेशंटचा खर्च ही महापालिका करणार मोफत खर्च

मेक इन इंडियाची संकल्पना आता आली. परंतु फिरोदिया परिवाराने १९७०च्या दशकातच ही  संकल्पना लुनाच्या माध्यमातून साकारली होती. लुना ही आताच्या पिढीला माहिती नसेल परंतु या वाहनाने तरूणाईला त्या काळी वेड लावले होते. त्या सायकलच्या युगात सर्वसामान्यांचे दुचाकीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम लुनाने केले. पेट्रोल संपले तरी ही लुना पायडल मारून सायकलसारखी चालविता यायची. त्यामुळे ती सर्वांना हवी हवी वाटायची. लुना खरेदीसाठी त्याकाळी नंबर लागायचे.

लुनाबाबत नगरचे इतिहास संशोधक प्रा.डॉ. संतोष यादव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियात फिरते आहे. लेखकाचे त्यावर नाव नाही. त्यातील काही अंश... 

अशी लागली पैज

लुना हा दुचाकीचा पहिलाच देशी अवतार होता. ती ५० सीसीची छोटीशी मोपेड होती. तिची डेक्कन िक्वन या रेल्वेसोबत पैज लावली. तत्कालीन विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पुणे स्टेशनवरून ही शर्यत सुरू झाली. तिचा शेवट दादरला होणार होता. मुंबईचे पोलीस कमिशनर स्पर्धेचा विजेता घोषित करणार होते.  
सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशनवरून सुटली. त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव व पत्रकारांच्या साक्षीने लुनाला देखील हिरवा झेंडा दाखवला. 

लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुनासमोर होती. लुना लोणावळ्यालाही जाणार नाही, असे लोकांना वाटायचे.

अशी संपली शर्यत

लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लुनाने तब्बल १५ मिनिट लवकर दादरमध्ये पोचून डेक्कन क्वीनला हरवलं. ही शर्यत पाहायला मुंबईतील पत्रकार आले होते. दुसऱ्या दिवशी  सर्व वर्तमानपत्रात लुनाचीच चर्चा. वास्तवात अशी शर्यत झाली होती की नाही, याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु नगरी लुनाची जोरदार सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे एवढं नक्की.

फिरोदियांचा वारसा

होंडाला भारतात आणलं ते फिरोदिया परिवारानेच. पुन्हा एकदा लुनाचा देशी अवतार या फॅमिलीने आणावा, अशी नगरकरांसह सर्वांना इच्छा आहे. तसेही फोर्स मोटर्सच्या माध्यमातून अभय फिरोदिया, कला, साहित्य, उद्योग क्षेत्रात नरेंद्र फिरोदिया, शिक्षण क्षेत्रात छायाताई फिरोदिया वारसा चालवित आहेत.

सामान्य माणसाच्या घरात लुना असायली हवी असे फिरोदिया परिवाराचा उद्देश होता. माझीही कॉलेज जीवनात पहिली दुचाकी लुनाच होती. लुनाविषयी कॉमन मॅनच्या खूप आठवणी आहेत. फिरोदिया परिवार भविष्यात नक्कीच काहीतरी नवीन देईल.

- नरेंद्र फिरोदिया, उद्योजक, अहमदनगर.

(लेखातील काही भाग फेसबुकवरून साभार.)