
MLA Hemant Ogle addressing the need for official drought declaration amid heavy rain in Shrirampur-Rahuri.
esakal
श्रीरामपूर: श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात शनिवारी (ता.२७) ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप पूर्णतः वाया गेला असून रब्बीचीही शाश्वती राहिलेली नाही. तुटपुंजी मदतीने परिस्थिती हाताळता येणार नाही; त्यामुळे सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली.