
अहिल्यानगर : उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावे, ही शिवसैनिकांप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती. अखेर मराठीच्या मुद्द्यावर ही दोन्ही भावंडे आज एकत्र आली आहेत. त्यामुळे राज्यभर शिवसैनिकांमध्ये (ठाकरे गट) उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिल्यानगरमध्ये सेनेला मोठे खिंडार पडले आहे.