एसटी सुरु झाली, आता प्रवासी रेल्वे सुरू करा 

गौरव साळुंके
Sunday, 6 September 2020

कोरोनाच्या संकटात पाच महिन्यांपासून वाहतुक सेवा ठप्प आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाच्या संकटात पाच महिन्यांपासून वाहतुक सेवा ठप्प आहेत. त्याचा फटका रेल्वे आणि एसटी विभागालाही बसला आहे. परंतू आता एसटी सुविधा सुरळीत होत असुन त्या पाठोपाठ प्रवासी रेल्वे वाहतुक सुरू करण्याची मागणी येथील सिंधी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 

कोरोनाचा फटका विविध क्षेत्राला बसला असुन सरकारचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडाला आहे. त्यामुळे नियम आणि अटी घालुन प्रवासी रेल्वे वाहतुक सुरु करावी. त्यामुळे रेल्वेतील भोजन विभागातीस कर्मचारी तसेच रेल्वे स्थानकासमोर फळे आणि अन्नपदार्थ विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळेल. 

रेल्वेत बसण्यासाठी पुरेशी जागा असल्याने सर्वांनी सोशल डिस्टस्निगच्या नियमांचे पालन करावे. तसेच रेल्वेच्या बोग्या नियमित सॅनिटाईज करण्यात याव्या. प्रवाशांनी सुचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संजय माखिजा, रविंद्र गेरेला, किशोर छतवाणी, बबलू सिंधीवाणी, मंगेश छतवाणी, बबलू आहुजा, श्रीचंद आहुजा, राजेश कुकरेजा यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand on behalf of Sindhi community to start passenger train