esakal | लोकांना का हवा आहे रोहित पवार "ब्रँड"; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातून निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for Rohit Pawar has increased across the state

 नव्या पिढीमध्ये कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडून तशी पावलं टाकली जात आहेत. केवळ पवार घराण्याचे वारसदार म्हणूनच नव्हे तर त्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे.

लोकांना का हवा आहे रोहित पवार "ब्रँड"; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातून निमंत्रण

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : राजकारणात महत्त्व कशाला असेल तर ते आश्वासक चेहऱ्याच्या नेत्याला. आता राज्याच्या राजकारणात असे किती नेते आहेत, हे सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहेत. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी बरंच काही करावं लागतं.

नव्या पिढीमध्ये कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडून तशी पावलं टाकली जात आहेत. केवळ पवार घराण्याचे वारसदार म्हणूनच नव्हे तर त्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. त्यांना येऊ लागलेल्या वाढत्या मागणीने राजकीय वर्तुळ अलर्ट झाले आहे. राजकीय विश्लेषकही त्यांच्या ब्रँड बनण्यामागच्या कारणांचा अभ्यास करीत आहे.

राज्याच्या राजकारणात 'क्रेज' वाढली आहे. विविध जिल्ह्यांतून  निमंत्रण वाढली आहेत. आमदार पवार यांनी नुकताच बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे  जिल्ह्याचा  दौरा केला. त्या पाठोपाठ आज ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवारांचे नातू अथवा पवार घरण्याचे तिसऱ्या पिढीतील वारसदार अशी ओळख सिमित न ठेवता; आपल्या कार्यबाहुल्याच्या बळावर अल्पावधीतच रोहित यांनी राज्यात स्वतःची वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले आहे.  

कर्जत-जामखेड मतदारसंघही पोहोचवला देशभर

सर्वात तरुण आणि सर्वाधिक प्रवास करणारे, अभ्यासू व कार्यक्षम, विकासाभिमुख 'नेतृत्व म्हणून आमदार रोहित यांना ओळखले जाऊ लागले आहे. राज्याच्या राजकारणात स्वतःच्या ओळखीबरोबरच मतदारसंघाचे नावही देशभर पोहचविले आहे.

येथे राबविण्यात येणारा प्रत्येक उपक्रम राज्याचे लक्ष वेधणारा ठरला आहे. आमदार पवार हे स्वतःच्या मतदारसंघात पुरेसा वेळ देतात. जनतेच्या सुख- दु:खात  समरस होतात. त्यांनी मतदारसंघात विकासाचे नवीन पर्व हाती घेतले आहे.

कोरोना काळात दिली राज्यभर मदत

'कोवीड'-19  च्या काळात त्यांनी मतदारसंघाबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यात दिलेली मदत आणि केलेल्या कामाची जनसामान्यांच्या मनावर नोंद झाली आहे. त्यांनी दाखविलेली सामाजिकता, दुरद्रष्टी अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. त्यामुळेच समाजातील अनेक दाते पुढे आले. त्यांनी मदत केली.

असे असतात कार्यक्रम

संकट ही संधी समजून आमदार रोहित पवारांनी केलेले काम त्यांची राजकीय 'उंची' आणि 'क्रेज' वाढवणारी ठरली. आमदार पवारांना राज्याच्या निरनिराळ्या जिल्ह्यातून कार्यक्रमांचे निमंत्रण वाढले आहेत. केवळ एका कार्यक्रमासाठी अन्य जिल्ह्यात जाण्याऐवजी दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांची यादीच पुढे येऊ लागली आहे. यामध्ये युवकांसह ज्येष्ठांबरोबरच्या संवादाची जोड घातली जाते. तसेच धार्मिकताही जपण्याचे काम केले जात आहे.

त्यांच्याकडे पाहू, बघतो असं नसतं

राज्यभर फिरताना स्वतः च्या मतदारसंघाकडे त्यांचे तसूभरही दुर्लक्ष होत नाही. मतदारसंघातील बारीक-सारीक गोष्टींची नोंद त्यांच्याकडे आहे. निर्णयक्षमता गतिमान असल्याने कोणताच विषय त्यांच्याकडून 'पेंडींग'  राहत नाही. पाहू, बघतो या वेळकाढू शब्दांना त्यांच्याकडे थारा नाही. प्रत्यक्ष कृतीला महत्त्व दिले जाते!

झगमगाटापासून दूर

विशेष म्हणजे मतदारसंघात दौरा करुनच अन्य जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्याचे 'तंत्र' त्यांनी स्वीकारले आहे. येथील कामांच्या बाबतीत पुढील वीस-पंचवीस वर्षे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नियोजन हाती घेतले आहे. तकलादू योजना, झगमगाट यापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. साधी राहणी, साध बोलणं आणि जमिनीवर पाय ठेवून चालणं सर्वांनाच चांगलेच भावते आहे.

एकदा सांगितलेला विषय पुन्हा सांगावा लागत नाही..!

एखादी समस्या अथवा विषय घेऊन शिष्टमंडळ अथवा कोणी व्यक्ती भेटला तर त्याचा विषय हातावेगळा करण्याचे प्रभावी तंत्र आमदार रोहित पवार यांनी आंगिकारले आहे. त्यामुळे एकदा सांगितलेला विषय पुन्हा सांगण्याची वेळ येत नाही, अशी सर्वसामान्यांमध्ये इमेज बनली आहे. 

भेटण्यासाठी मध्यस्थ लागत नाही
कोणतेही काम घेऊन सर्वसामान्य व्यक्ती थेट आमदार रोहित पवारांना सहजासहजी भेटू शकते. याकरिता कोणी मध्यस्थ लागत नाही. सर्वसामान्य व्यक्ती समक्ष भेटतात,  फोनवर संपर्क साधतात आणि आपल्या कामाची विचारपूस करतात.

रोहित पवार नावाचा ब्रँड

रोहित पवार हे केवळ आमदार आहेत. मंत्र्यांना एवढी निमंत्रण येणार नाहीत, एवढी त्यांना राज्यभरातून मागणी वाढली आहे. केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठीही ही जमेची बाजू आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image