गावठी अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असूनही ग्रामीण व आदिवासी भागातील अंडी झाली गायब

शांताराम काळे 
Monday, 28 September 2020

तालुक्यात गावठी अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असून हे अंडेच सध्या गायब झाले आहेत.

अकोले (नगर) : तालुक्यात गावठी अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असून हे अंडेच सध्या गायब झाले आहेत. पाच काय घेतो भाऊ पंधरा देतो पण पाच तरी अंडी घ्या, पण नाही. सध्या कोरोना असल्याने आणि कोरोनाला तोंड देण्यासाठी जो अंडी खाईल त्याला कोरोना होणार नाही, असे सल्ले डॉक्टर देत आहेत. 

डॉक्टर सांगत असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील अंडी गायब झाली आहेत. तर काही व्यावसायिक ही अंडी खरेदी करण्यासाठी गावात पोहचली आहे, पण त्यांचा शेफाटा तर गावकऱ्यांनी काढला आहे. अंडे तर नाहीच पण गावात येऊ नका, आमचे गाव नासवू नका. होते नव्हते तितके अंडे संपवून टाकले असे उत्तर दिल्याने व्यवसायिक पुन्हा आपल्या गावी परतले आहे. त्यामुळे गावठी अंडे व गावठी कोंबडी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ती मिळविण्यासाठी वाट्टेल ते म्हणत आदिवासी बेरोजगार तरुणांनी ही अंडी गोळा करून ठराविक ठिकाणी विक्री करत आहे, मात्र कोंबडीचे अंडे २० रुपयांपर्यंत जाऊन भाव वधारले आहेत. तर इंग्लिश कोंबडीचे अंडे ही आठ रुपयापर्यंत गेले आहे. काहींनी अंड्याचा स्टॉक करून ठेवला आहे. शालेय पोषण आहारातील अंडे ही गायब झाले आहेत, त्यामुळे अंगणवाडी सेविका त्या ऐवजी दूध देतात. असे बहुतेक ठिकाणी सुरू आहे .

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demand for village eggs is high and these eggs are currently missing