पाथर्डीत मनसेची रस्त्यासाठी तोडफोड

राजेंद्र सावंत
Monday, 14 September 2020

राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हते. भ्रमणदुरध्वनीवरुन संपर्क साधला तर अधिका-यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. संतप्त कार्यकर्त्यांनी उपविभागीय अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घातला. घोषणाबाजी करीत कार्यालयातील टेबलावरील काचा फोडल्या.

पाथर्डी : कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी सोमवारी येथील महामार्गाच्या कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घातला. कार्यालयाचीही तोडफोड केली.

या नंतर पालिकेतही अंदोलकांनी मुख्याधिकारी धनजंय कोळेकर यांना धारेवर धरले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत अंदोलकांना शांत केले.

हेही वाचा - छत्रपती महाविद्यालयात कोविड सेंटर

महामार्गावर मुरुम टाकण्याचे काम सुरु झाले आणि अंदोलन मागे घेतले. महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, प्रवीण शिरसाट, सोमनाथ फासे, संदिप काकडे, जयंत बाबर, संजय चौणापुरे, राजू गिरी, गणेश कराडकर, एकनाथ भंडारी, एकनाथ सानप, रंगनाथ वांढेकर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व नगरपरिषदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत अंदोलन केले.

येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हते. भ्रमणदुरध्वनीवरुन संपर्क साधला तर अधिका-यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. संतप्त कार्यकर्त्यांनी उपविभागीय अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घातला. घोषणाबाजी करीत कार्यालयातील टेबलावरील काचा फोडल्या.

कार्यालयात केवळ लिपीक व एक शिपाई होते. त्यानंतर मोर्चेकरी नगरपालिकेच्या कार्यालयात गेले. तेथे मुध्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी मनसेच्या पदाधिका-यांची बाचाबाची झाली.

नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनी अांदोलकांशी चर्चा केली. महामार्गाचे काम व्हावे, यासाठी अांदोलन करणे गैर नाही. पालिकेच्या रस्त्याच्या विषयावर मार्ग काढला जाईल, असे गर्जे यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्यावर मुरुम टाकायला सुरुवात केल्यानंतर अंदोलन मागे घेतले.

संपादन - अशोक निंबाळकर   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demolition of MNS road in Pathardi