esakal | प्लॅस्टिकची भेसळ नाही, फोर्टिफाईड तांदूळ विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक
sakal

बोलून बातमी शोधा

plastic rice

प्लॅस्टिकची भेसळ नाही, फोर्टिफाईड तांदूळ विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नगर : शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेल्या तांदळात प्लॅस्टिकची भेसळ झाल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून होत आहे. हा फोर्टिफाईड तांदूळ असून, विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहे. त्यामुळे तांदळाविषयी असलेला संभ्रम मनातून काढून तो विद्यार्थ्यांना खाण्यास द्यावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने एक एप्रिल २०२१ पासून शालेय पोषण आहारात फोर्डिफाईड तांदूळ वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त झालेला फोर्टिफाईड तांदूळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. या तांदळाच्या पिठात आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी-१२ हे घटक आहेत. हा तांदूळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून, त्यामुळे लोहाची कमतरता, अशक्तपणा व महत्वपूर्ण सूक्ष्म घटकांची स्थिती सुधारते. तसेच ॲनिमिया, रक्तशय होऊ नये, यासाठी उपयुक्त आहे. पालकांनी मनात कुठलाही संभ्रम न बाळगता या तांदळाचा विद्यार्थ्यांच्या आहारात वापर करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे. (Department of Education said that fortified rice is nutritious for students)

हेही वाचा: कन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’; विधिवत पार पडला सोहळा

loading image
go to top