
अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कांदा क्लस्टरची उभारणी करण्यात आली आहे. राजगुरूनगर भागात नऊ महिने टिकणारे कांद्याचे वाण उपयोगात आणले जात आहे, असे चांगले वाण येथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. अकोले, श्रीगोंदा व कर्जत येथील उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या.