
पाथर्डी: माजी जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौण्ड यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पंधरवड्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली. मुंबई येथे समर्थकांसह दौण्ड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.