उपमहापौर मागताहेत महापालिकेसाठी अभियंते 

The deputy mayor is asking Engineers for the Corporation
The deputy mayor is asking Engineers for the Corporation
Updated on

नगर : महापालिकेतील शहर अभियंता, विद्युत व जलअभियंता या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाहीत. प्रभारी कारभार सुरू आहे. राज्य शासनाकडून या पदांसाठी पूर्णवेळ अभियंते मिळावेत, अशी मागणी उपमहापौर मालन ढोणे यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली आहे. 

ढोणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नगर महापालिकेमध्ये अभियंत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडील विकासकामांचे प्रस्ताव तयार करणे, मोजमाप आखणे, अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता घेणे व इतर कामांसाठी अभियंत्यांची कमतरता आहे.

महापालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या अभियंत्यांना शहर अभियंतापदाचा प्रभारी कार्यभार द्यावा लागतो. प्रभारी शहर अभियंता पूर्ण वेळ या विभागाकडे देऊ शकत नाही. यामुळे कामांचा वेग कमी होतो. त्यांच्याकडे इतरही पदभार असल्याने ते या पदाला न्याय देऊ शकत नाहीत.

शासनाच्या "अमृत'सारख्या योजना लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्‍यक आहे. शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध कामे करताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात. महापालिकेकडे विद्युत अभियंता नसल्यामुळे शहरामधील पथदिव्यांची नवीन कामे करण्यासाठी मंजुरी मिळत नाही.

विद्युत विभागाची कामे बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांना व प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. बांधकाम, विद्युत व पाणीपुरवठा विभागाच्या कामांमध्ये दर्जा व गुणवत्ता राखली जावी व कामांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी मदत व्हावी, यासाठी शासनाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आदींकडील अभियंते मिळण्याकरिता मागणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

- संपादन ः दाैलत झावरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shirdi Sweet Shop Under Scanner After Fungus Detected in Chiranjeev Peda
Farmer Asked to Pay ₹1.2 Lakh to Receive Land Acquisition Compensation; Two Held
Rahuri-Shani Shingnapur Railway Project Sparks Outrage Over Farmland Acquisition
Pandharpur Wari Reaches the World Stage with Landmark London Launch
Marathi News Esakal
www.esakal.com