

Lack of Documents Leaves Tribal Students Deprived of Education Benefits
sakal
-शांताराम काळे
अकोले : आधारकार्ड आणि जातीच्या दाखल्यांच्या कागदपत्रांच्या अडथळ्यात अकोले तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अडकले आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनाथ व वंचित विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती, शासकीय योजना, आरक्षणाचा लाभ आणि पुढील शिक्षणाच्या संधीपासून दूर राहण्याची भीती निर्माण झाली आहे.