भाजपात इतर पक्षांप्रमाणे दुकानदारी चालत नाही : फडणवीस | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपात इतर पक्षांप्रमाणे दुकानदारी चालत नाही : फडणवीस
भाजपात इतर पक्षांप्रमाणे दुकानदारी चालत नाही : फडणवीस

भाजपात इतर पक्षांप्रमाणे दुकानदारी चालत नाही : फडणवीस

पारनेर : आमच्या पक्षात इतर पक्षाप्रमाणे दुकानदारी चालत नाही. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षनिष्ट व सक्षम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सतत बळ देण्याचे काम करत आहोत, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी केले.फडणवीस रात्री (ता. २९) उशिरा मुंबईकडे रवाना होताना सुपे येथे थांबले होते. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस हे माजी मंत्री शिवाजी कर्डिले(ex minister shivaji cardile) यांच्या मुलाच्या विवाहासाठी नगर येथे आले होते. त्यांच्याबरोबर माजीमंत्री राम शिंदे (ram shinde)व गिरीश महाजन(girish mahajan) हेही उपस्थित होते. (devendra fadnavis alleges MVA government)

पारनेर तालुका भारतीय जनता पक्ष व सुपे शहर भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा सत्कार झाला. तालुकाध्यक्ष वसंत चेडे, जिल्हा सरचिटणीस सुनील थोरात, उपसरपंच सागर मैड, अमोल मैड, सोमनाथ नांगरे आदींसह भाजपचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, आम्ही कार्यकर्त्यांना ताकद देत नाही असा अारोप चुकीचा आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना चांगल्या व सामाजिक कामासाठी सतत ताकद देत असतो. चुकीच्या कामांचे आम्ही कधीही समर्थन करत नाहीत.

हेही वाचा: नागपूरात वीस वर्षात १५ छोटे तलाव गायब!

सुपे स्मार्ट सिटी व्हावी

सुपे येथे औद्योगिक वसाहत व नव्याने उभ्या राहात असलेल्या जपानीज हबमुळे सुप्याचे शहरीकरण होत आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी सुपे गाव एक स्मार्ट सिटी म्हणून पुढे यावे. यासाठी गावातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी उपसरपंच सागर मैड यांनी निवेदनाद्वारे केली. उशिर झालेला असतानाही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी केल्याने ते समाधान पावले.

Web Title: Devendra Fadnavis Alleges Mva Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top