

CM Fadnavis Orders CBI Probe into ‘CISPE’ Scam
Sakal
अहिल्यानगर : गरिबांना लुबाडण्याचे काम काही कंपन्यांकडून होत आहे. सिस्पेसारख्या कंपन्यांची चौकशी करू. ज्यांनी गैरव्यवहार केला, गरिबांचे पैसे खाल्ले, त्यांना जेलची हवा देऊ, याबाबत देशाच्या गृहमंत्र्यांशी चर्चा करून या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’ मार्फत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.