

“Police arrest gang looting devotees; mastermind Lakhan Kasar absconding.”
Sakal
पाथर्डी: नाशिक येथील भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या पोलिसांनी २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. लुटमार करून पसार झालेल्या पाच आरोपींना आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांसह नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लखन बाबासाहेब कासार फरार आहे.