
अहिल्यानगर: शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या बनावट ॲप प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भाविकांना सशुल्क दर्शन सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सात पैकी चार ॲप बोगस आहेत. तसेच या ॲपच्या माध्यमातून देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल एक कोटी रुपये जमा झाले असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.