
श्रीरामपूर: प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन गोदावरीच्या तीरावर भक्ती, ज्ञान आणि अन्नदानाचा एक अद्वितीय संगम पाहायला मिळत आहे. देवगाव शनी शिवारातील गोदातीरी माळावर साजरा होत असलेला सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह केवळ धार्मिक सोहळा नसून, भाविकांच्या आत्मिक कल्याणासाठी घडणारा एक दिव्य महायज्ञ ठरत आहे.