Dhangar Reservation: धनगर आरक्षणप्रश्नी हालचाली सुरू, लवकरच होणार ठोस निर्णय; राम शिंदे यांचे सुतोवाच

लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आमदार शिंदे यांनी यावेळी केले.
 Ram Shinde
Ram Shinde

जामखेड : धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने चौंडी येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन विचारपूस केली. धनगर आरक्षणप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरु असून, लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आमदार शिंदे यांनी यावेळी केले.

यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे म्हणाले, की धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यांपूर्वी तब्बल २१ दिवसांचे आमरण उपोषण केले. ते उपोषण थांबविताना राज्य सरकारने ५० दिवसात अंमलबजावणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com