

Ahmednagar Municipal Worker Dheeraj Pardeshi Dies Hindu Groups Protest And Demand Strict Action Against Attackers
sakal
अहिल्यानगर: तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असलेले महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचा आज (ता. ९) उपचारादरम्यान मृत्यू झाला. सात ते आठ जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच हिंदुत्ववादी संघटनांनी दुपारी ४ च्या सुमारास शहर बंदची हाक दिली. शहरासह उपनगरातून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी सायंकाळी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींच्या फाशीची मागणी केली.