खंडणीच्या गुन्ह्यात दिगंबर गेंट्याल अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

हॉटेलचा दारू विक्री परवाना रद्द करतो, असे सांगून हॉटेल मालकाकडून तीन लाखांची खंडणी मागणाऱ्याला एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्याच्या आरोपावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दिगंबर लक्ष्मण गेंट्याल (रा. कुष्ठधाम रोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे. 

नगर : हॉटेलचा दारू विक्री परवाना रद्द करतो, असे सांगून हॉटेल मालकाकडून तीन लाखांची खंडणी मागणाऱ्याला एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्याच्या आरोपावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दिगंबर लक्ष्मण गेंट्याल (रा. कुष्ठधाम रोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे. 

आवश्‍य वाचा नगरमधील ओढ्या, नाल्यांचा श्‍वास गुदमरला 

अधिक माहिती अशी, तक्रादार यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारू विक्री परवान्यासाठी अर्ज केला होता. अर्जावरून परवाना मिळाला होता. त्यांनी हॉटेल चालू केले होते. आरोपी दिगंबर गेंट्याल याने त्या परवान्याबाबत माहिती अधिकार अन्वये उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राच्या आधारे परवाना दिला, अशी माहिती मागविली होती. या माहितीच्या आधारे गेंट्याल तक्रारदाराला हॉटेल परवाना नियमानुसार नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तुझा परवाना रद्द करतो, अशी धमकी देत होता. त्यासाठी तो तक्रारदार यांना तीन लाख रुपयांची खंडणी मागत होता. याबाबत तक्रारदार यांनी गेंट्याल विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात अर्ज केला. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तत्काळ दखल घेऊन आरोपी पकडण्यासाठी सापळा लावला. तक्रारदार याच्याकडून गेंट्याल याला एक लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी पंचांसमक्ष पकडले. 

आवश्‍य वाचा पोलिस वसाहत व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पाणी 

त्याच्याकडून एक लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. याबाबत श्रीनिवास दत्तात्रेय रासकोंडा (रा.वरवंडे गल्ली, माळीवाडा) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक समाधान सोळंके, सूरज मेढे, पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र पांडे, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले यांच्या पथकाने केली. अहमदनगर

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digambar Gential arrested for ransom