esakal | डिंभे, वडज, चिलवडी धरणे ओव्हर फ्लो!
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभे धरण

डिंभे, वडज, चिलवडी धरणे ओव्हर फ्लो!

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : कुकडी प्रकल्पातील डिंभे, वडज, चिलवडी ही महत्त्वाची धरणे आज (सोमवार) दुपारी तीन वाजता ओव्हर फ्लो झाली. परिणामी डिंभेमधून पाच हजार, तर वडजमधून दोन हजार क्यूसेक्सचा विसर्ग घोड नदीला सोडण्यात आला होता. चिलवडीमधून पाचशे क्यसूेक्स पाणी येडगाव धरणाकडे सोडण्यात आले आहे. कुकडी प्रकल्पात आता २१ टीएमसी पाणीसाठा झाला असून, घोड धरणातही पाण्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

कुकडी व घोड प्रकल्पातील पाण्यावर श्रीगोंद्यातील मोठे क्षेत्र अवलंबून आहे. मात्र कुकडी प्रकल्पासह घोड धरणात पाण्याचा साठा कमी आहे. परतीचा पाऊस कुकडीच्या धरणांवर पडत नसल्याचा अनुभव असल्याने मध्यंतरी कुकडीचे सुरू असणारे आवर्तन श्रीगोद्यात आल्यावर थांबविण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील कुकडीखालच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, घोड धरणातून काही दिवसांपूर्वी आवर्तन पूर्ण झाले असले, तरी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने त्याही लाभधारकांची धडधड वाढलेली आहे.

दरम्यान, काही दिवसांत कुकडी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसाने धरणांची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डिंभे, वडज व चिलवडी धरणे आज दुपारी तीन वाजता ओव्हर फ्लो झाली. डिंभेतून पाच हजार, वडजमधून दोन हजार क्यूसेक्स पाणी घोड नदीत सोडण्यात आले. घोड धरणात आज केवळ दीड टीएमसी उपयुक्त पाणीसाठी असून, नव्या पाण्याची आवक सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी चिलवडी धरणातून कुकडीच्याच येडगाव धरणात पाचशे क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. या सगळ्यात शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

कुकडीतून श्रीगोंद्यासाठी आवर्तन सोडा : जगताप

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, कुकडीच्या डाव्या कालव्यातून श्रीगोंद्यासाठी शेतीचे आवर्तन सुरु करण्याची मागणी केली आहे. येडगाव धरणात आता दीड टीएमसी पाणी असून, नव्या पाण्याची आवक होत आहे. त्यातच तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतातील उभी पिके वाचविण्यासाठी हे आवर्तन तातडीने सोडावे, ही मागणी आपण वरिष्ठांकडे केली आहे.

हेही वाचा: अकोले : निळवंडे धरणातून दहा हजार क्युसेक्सने विसर्ग

loading image
go to top