esakal | अकोले : निळवंडे धरणातून दहा हजार क्युसेक्सने विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Nilwande Dam

अकोले : निळवंडे धरणातून दहा हजार क्युसेक्सने विसर्ग

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर ) : भंडारदरा जलाशय तुडुंब भरल्यानंतर आज (सोमवार) सायंकाळी निळवंडे जलाशय तांत्रिकदृष्ट्या भरल्याने जलाशयातून दहा हजार १४४ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी दिली. निळवंडे जलाशयाची क्षमता आठ हजार ३२ दशलक्ष घनफूट असून, सकाळी जलाशयात सात हजार ८१३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने पाणी सोडण्यात आले.


ऑगस्टच्या सुरुवातीलाच दडी मारुन बसलेल्या वरुणराजाचे गेल्या बुधवारी (ता.८) राज्यात पुनरागम झाले. त्यातच नगर व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोटातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने लाभक्षेत्रातील चिंतेचे ढग बाजूला सरुन चैतन्य निर्माण झाले आहे. रविवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता भंडारदरा धरण भरल्यानंतर धरणातून सुरुवातील चार हजार ४०० क्यूसेक्स व त्यानंतर सात हजार ७४४ क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात असल्याने आज सकाळी सहा वाजता ९० टक्के भरलेले निळवंडे धरण दुपारी तीन वाजेपर्यंत ९५ टक्क्यांवर पोहोचले. त्यामुळे निळवंडे तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे धरण व्यवस्थापनाने आज पहाटेपासून धरणातू सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करुन आठ हजार ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच प्रवरामाई दुथडी भरुन वाहू लागली आहे.

सध्या निळवंडे धरणात आठ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी दाखल होत असून, आज सायंकाळपर्यंत सोडण्यात येत असलेल्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: अकोले : बीजमातेनी साकारला बियांचा गणपती बाप्पारंधा फॉल लागला कोसळू

भंडारदरा जलाशयातून सात हजार ४०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू असल्याने रंधा फॉल कोसळू लागला आहे. त्याला पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. फॉल सोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाई धावपळ करताना दिसत आहे. पाणलोट क्षेत्रत इतर पांढरे शुभ्र धबधबे काळ्या कतळावरून कोसळताना त्यांचा आविष्कार पाहताना निसर्गप्रेमी सुखावून जात आहेत.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

loading image
go to top